२८ नोव्हें, २०११

कोलावरीची धुम ...

कोलावरी डी .. जिकडे बघाव ह्याचीच चर्चा. परवा महाराष्ट्र टाईम्स मध्ये चक्क पान भरुन लेख. ( तो पर्यंत हा प्रकार काय आहे हे आमच्या गावीही नव्हतं ) अमिताभ बच्चन सह अनेकांनी स्तुती केलीये ह्या गाण्याची. धनुश ( उर्फ जावई-ए-रजनीकांत) ह्याने हे अगदी २० मिनीटात लिहलेलं गाणं त्यानेच गायलं. ( ह्याला फाईटींग करताना पाहुन अजय देवगनने कॉमेडीकडे वळायचं ठरवलं अशी बातमी आहे म्हणे. ...असो ). लेडी गागाच्या गाण्याच्या युट्युब वीव्हुसला टक्कर दिलीये म्हणे ह्या गाण्याने ( रजनीकांतने लेडी गागाच्या गाण्याच्या युट्युब वीव्हुस थांबवुन ठेवले होते असही काही जणांच म्हणण आहे   ... असो ) . तर मोरल ऑफ र स्टोरी हे गाण एकदम जोरात चालु आहे. मग बघुनच टाकुया येकदा म्हणत युटुब चालु केलं. छानच बनलय गाण त्याबद्द्ल वाद नाही. पण आणखी मजेची गोष्ट म्हणजे ह्या गाण्याची अनेक विडंबनही निघालीत. तीच शेयर करण्यासाठी आजची ही पोस्ट.


२१ नोव्हें, २०११

मराठीखरेदी.कॉम फॅन स्पर्धा !

Aनमस्कार मित्रांनो,
आपल्या वाचकांसाठी आम्ही घेवउन येत आहोत एक नवीन उपक्रम " मराठीखरेदी.कॉम ". मराठीखरेदी.कॉम द्वारे वाचकांना मराठी पुस्तक, संगीत, चित्रपट, आणि ईतर मराठी उत्पादने ह्याबद्द्ल माहीती पुरवण्याचा आमचा मानस आहे. आणि त्यासाठी आम्ही सादर करत आहोत "मराठीखरेदी.कॉम फॅन स्पर्धा !" . मराठी खरेदीचे फेसबुक फॅन बना , मिळ्वा पुस्तक जिंकण्याची संधी.

१० नोव्हें, २०११

मिळवा $ १२५ पर्यंत फेसबुक अ‍ॅड्स कुपन मोफत

फेसबुक.कॉम जगातली नं. १ ची वेबसाईट झाली आहे ही गोष्ट आता नवीन राहीली नाही. फक्त मित्र मैत्रिणी जोडण्यासाठी सुरु झालेली ही सोशल नेट्वर्किंग वेबसाईट आता मार्केटींगचं सर्वोत्तम माध्यम बनल आहे. फॅनपेजेस आणि फेसबुक अ‍ॅड्स द्वारे जगभरातल्या ८०० मिलीयन ( ८०,००,००,००० ) लोकांपर्यंत स्वतःची वेबसाईट किंवा उत्पादनाची जाहिरात करणे आता शक्य झाले आहे. फक्त मोठाले उद्याओगच नाहीत, तर छोटे व्यापारी, हॉटेल बिझनेसेस, ब्लॉग लेखक ईंटरनेट मार्केटर ह्यांनी सुद्धा फेसबुक.कॉम चा वापर करणे सुरु केले आहे.

फेसबुकची मार्केटिंग पॉवर जगासमोर अधिक उत्त्म तर्हेने मांडण्यासाठी फेसबुक.कॉम ने आपला पहीला वहीला बुटकॅम्प आयोजित केला आहे. ह्या बुटकॅम्पमार्फत तुम्ही मिळवु शकता-
  • फेसबुक फॅनपेजेस, फेसबुक अ‍ॅड्स आणि फेसबुक मार्केटींगची ईत्थंभुत माहीती.
  • $ १२५ पर्यंत अ‍ॅड्स क्रेडिट.

ह्या बुटकॅम्पचा लाभ घेण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

२१ जुलै, २०११

अ‍ॅपल आयपॉड २६.५२ रु. फक्त

अ‍ॅपल आयपॉड : २६.५२ रु.
सॅमसंग  गॅलक्सी -  II : ६५.०१ रु.
सोनी ब्रायवल टि.व्ही. : ७३.२३ रु.
सोनी एस. एल. आर. कॅमेरा : ९.०४ रु.

किमती ऐकुन विचारात पडलात ना ? बट डोन्ट वरी ब्रॅन्डेड प्रॉडक्ट्स , अगदी कमी भावात जिंकण्याची संधी तुम्हाला उपलब्ध करुन देणार्‍या वेबसाईट बद्द्ल आज सांगणार आहे.

७ जुलै, २०११

ऑनलाईन शॉपिंग डिस्काऊंट कुपन्स

" शॉपिंग म्ह्टलं की बायकांच्या जिव्हाळ्याचा विषय " पण बायकांच्या शॉपिंगला नाव ठेवणारे पुरुषही काही कमी नाहीत . शॉपिंगला जायचं म्हणजे विकएन्ड राखुन ठेवायचा , यादी बनवायची आणि मोहीमेवर निघायचं. महीना अखेर आहे आत्ता नको ही कारणं जुनी झालीत अब तो क्रेडिड कार्ड है ना .

 पण आजकाल " ऑनलाईन शॉपिंग " चा  ऑप्शन हळु हळु पॉपुलर होत चाललाय. तसं ऑनलाईन शॉपिंग आपल्याकडे पुर्वीपासुन आहे पण ऑनलाईन  क्रेडिड कार्ड फ्रॉड च्या भीतीने ह्याच्या वाटेला सहसा कुणी जात नसे.नेट बँकींग सुद्धा प्रचलित नव्हतं. पण हल्ली बँकींग सेवांमध्ये आणि ईंटरनेट सिक्युरिटीमध्ये अमुलाग्र बदल झाल्याने बरेचजण ऑनलाईन शॉपिंग कडे वळायला लागले आहेत. त्यामुळे फ्लिपकार्ट , a1books , रेडिफ शॉपिंग ह्या साईट्स ही लोकप्रिय होत आहे. अ‍ॅमॅझॉन ह्या साईटने ही भारतात होम डिलीवरी सेवा सुरु केली आहे.