कोलावरी डी .. जिकडे बघाव ह्याचीच चर्चा. परवा महाराष्ट्र टाईम्स मध्ये
चक्क पान भरुन लेख. ( तो पर्यंत हा प्रकार काय आहे हे आमच्या गावीही
नव्हतं ) अमिताभ बच्चन सह अनेकांनी स्तुती केलीये ह्या गाण्याची. धनुश
( उर्फ जावई-ए-रजनीकांत) ह्याने हे अगदी २० मिनीटात लिहलेलं गाणं त्यानेच
गायलं. ( ह्याला फाईटींग करताना पाहुन अजय देवगनने कॉमेडीकडे वळायचं ठरवलं
अशी बातमी आहे म्हणे. ...असो ). लेडी गागाच्या गाण्याच्या
युट्युब वीव्हुसला टक्कर दिलीये म्हणे ह्या गाण्याने ( रजनीकांतने लेडी
गागाच्या गाण्याच्या युट्युब वीव्हुस थांबवुन ठेवले होते असही काही जणांच म्हणण आहे ... असो ) . तर मोरल ऑफ र स्टोरी हे गाण एकदम जोरात चालु आहे. मग बघुनच टाकुया येकदा म्हणत युटुब चालु केलं. छानच बनलय गाण त्याबद्द्ल वाद नाही. पण आणखी मजेची गोष्ट म्हणजे ह्या गाण्याची अनेक विडंबनही निघालीत. तीच शेयर करण्यासाठी आजची ही पोस्ट.
ओरिजल गाण :
मराठी व्हर्जन :
गुजराथी व्हर्जन :
जापनीज डान्स ऑन कोलावरी डी :
करंट ईव्हेन्ट व्हर्जन :
कशी वाटली व्हर्जनस ?
हया व्यतीरिक्त काही व्हर्जनस तुम्हाला माहीत असल्यास कमेन्ट्समध्ये पोस्ट करा.