'हरिश्चंद्राची फॅक्टरी' ह्यावर्षीची भारताची ऑस्करवारीसाठी अधीकृत ऍन्ट्री. ‘श्वास’ नंतर मराठीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. ऑस्करवारीसाठी अधीकृत ऍन्ट्री जाहीर झाल्यानंतर सगळीकडे कुजबुज सुरु झाली," अरे हा कुठला नवीन मुव्ही?"
सांगायचं तर हा मुव्ही मझ्यासारख्या बर्याच जणांना अपरीचीत असला तरी आजपर्यंत ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटानं अनेक देशी-विदेशी चित्रपट महोत्सवांमध्ये अनेक मानाचे पुरस्कार मिळवले आहेत. ही डॉक्युमेन्ट्री मुळीच नाही, भारतातल्या पहिल्याचलचित्राच्या निर्मीतीचा प्रवास दाखवणारा चित्रपट आहे. 'लग्नकल्लोळ' आणि 'मुक्कामपोस्ट बोंबिलवाडी' सारखी उत्कृष्ट नाटके देणार्या परेश मोकाशी ह्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. दादासाहेब फाळके ह्या भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक. ह्या असामान्य व्यक्तीमत्वाच्या असामान्य प्रयत्नांना मानवंदना देण्याचा परेश मोकाशी ह्यांचा हा प्रयत्न खरोखर वंदनीय आहे. नंदू माधव आणि विभावरी देशपांडे ह्यांची प्रमुख भुमिका असणार्या ह्या चित्रपटात आनंद मोडक ह्यांच संगीत असुन कला-दिग्दर्शन नितीन देसाई ह्यांचे आहे.
‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ ची वेबसाईटही लक्षणीय आहे . फॅक्टरीच्या ऑस्करवारीला हार्दीक शुभेच्छा !!
IMEI नंबरचा थोडक्यात परिचय म्हणजे प्रत्येक मोबाईलचा युनीक नंबर जो बॅटरीच्या खाली फोनवर प्रिंट असतो किंवा आपल्या मोबाईलवर *#06# टाईप करुन सुद्धा हा नंबर पाहता येतो.
International Mobile Equipment Identity ( IMEI ) ह्याचा खरा उदोउदो झाला दहशतवादी हल्ल्यांनंतर. कारण संपर्कांसाठी दहशतवाद्यांनी चीनी बनावटीचे मोबाईल फोन वापरात घेतले होते त्यांना योग्य ( Valid ) IMEI नंबरच नव्हता. त्यामुळे त्यांचा माग काढणे पोलिसांना मुश्किल झाले. ह्या सगळ्या प्रकरणाने खडबडुन जागे होत सरकारने अयोग्य IMEI नंबर असणार्या मोबाईलवर बंदी आणण्याचे ठरवले. त्यामुळे गोची झाली चायनीज फोन वापरणार्यांची. कारण हे फोन अगदी ४/५ हजारात टचस्क्रीन , एम पी -४, ८ जीबी मेमरी , २ सीम , ३ सीम अश्या फिचर्ससहित मिळतात. लो बजेट असणार्यांसाठी किंवा दर २/३ महिन्यांनी फोन बदलणार्यांसाठी हे फोन म्हणजे पर्वणीचं. आता नवीन येणारे चायनीज फोन " वीथ युनीक IMEI नंबर " किंवा " टोटल मनी बॅक ईफ फाऊंड फेक " अशी जाहिरात करत फोन विकत असले तरी त्यांची विश्वासहर्ता तपासणार कशी ?
तर कोणत्याही मोबाईलचा IMEI नंबर तपासण्यासाठी नंबरींग प्लॅन ह्या बेवसुविधेची मदत घेता येईल. आपल्या मोबाईलवर *#06# टाईप करुन स्क्रीनवर आलेला IMEI नंबर ह्या पेजवर चेक करु शकतो . उदाहरणादाखल खालील रिझल्ट पहा.
मग वाट कसली पाहताय ? निकालो मोबाईल और हो जावो शुरु !!
कम्प्युटर वा ईंटरनेट वापरतं असताना बर्याच वेळा असं जाणवतं ...अरे " असं करता आलं असतं तर ? " किंवा " असं एखादं सॉफ्टवेअर असतं तर ?". मग सुरु होतं गुगलींग. गुगलींग करता करता अशी अनेक अप्लीकेशनस सापडली. त्याबद्द्ल आज मी लिहणार आहे. १. डिग्सबाय ( digsby )
Yahoo ,Google Talk, MSN अश्या वेगवेगळ्या मेसेंजरवर लॉगिन करुन चॅट करताना नेहमी वाटायचं एक कॉमन मेसेंजर असता तर ? त्यावर उत्तर मिळालं.. "digsby आहे ना भाऊ !! " digsby वापरुन AIM, MSN, Yahoo, ICQ, Google Talk, Jabber वर चॅट तर करता येतेचं शिवाय Facebook, Twitter, MySpace , LinkedIn ह्यांसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सचे अपडेट्स पण पहाता येतात.
स्टार्ट मेनुचा तोच तोच लूक पाहुन कंटाळा आलाय ? मगं " व्हिस्टा स्टार्ट मेनु " नक्की वापरुन पहा. विंडोज व्हिस्टा आणि विंडोज एक्स्पी ह्या दोन्ही ऑपरेटींग सिस्टमवर कॉम्पॅटीबलं असणारा हा स्टार्ट मेनु फक्त लूक बदलत नाही तर काही जास्तीचे पावर ऑप्शनही देतो.
सोनी ईरिक्सनचे मोबाईल हॅन्डसेट वापरणार्यांसाठी " माय फोन एक्सप्लोरर " ही एक जबरदस्त युटीलीटी आहे. ह्या सॉफ्टवेर द्वारा आपला सोनी ईरिक्सन फोन पीसीसुट पेक्षाही उत्तमप्रकारे कम्प्युटरसोबत सिंक्रोनाईज करता येतो. जसे आपले कॉन्टॅक्ट्स आऊट्लुक सोबत जीमेल कॉन्टॅक्ट्स बरोबर सुद्धा सिंक्रोनाईज करता येतात. कॅलेंडर ईव्हेण्ट गुगल कॅलेंडरसोबत सिंक्रोनाईज करता येतात.आपला फोन कम्प्युटरला जोडुन कम्प्युटरमधुन SMS वाचु शकतो, सेव्ह करु शकतो आणि टाईप करुन पाठवुही शकतो. ईतकेच नाही तर कम्प्युटरमधुन कॉलसुद्धा करु शकतो.
बर्याचदा वर्ड फाईल ईमेल्मधुन पाठवल्यानंतर समोरच्याकडे ओपन केल्यानंतर फाईलच फॉरमॅटींग बदलते. कधी कधी फॉन्ट्सपण बदलतात. ह्यावर ऊपाय म्हणजे पीडिफ पाठवणे. आपण पाठवलेल्या फाईल मध्ये कुणी बदल करु नये असे वाटत असल्यास पीडिफ पाठवणे अतीऊत्तम. पीडिफ ९९५ हा व्हर्च्युअल प्रिन्टर वापरुन आपण सर्वप्रकरच्या फाईल्स अगदी सहजपणे पीडिफ फॉरमॅट मधे सेव्ह करु शकतो.प्रिन्ट कमांड दिल्यानंतर हा व्हर्च्युअल प्रिन्टर सिलेक्ट करायचा की कोणतीही फाईल पीडिफ फॉरमॅट मधे सेव्ह होते. आहे ना झक्कास !!