२० जुलै, २०१०

रुपयाचं नव रुप मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये !!


रुपयाला नविन चिन्ह मिळालंय हि बातमी एव्हाना जुनी झालीये . नविन चिन्ह मिळालंय पण पुर्णपणे वापरात येण्यासाठी तरी अजुन अवधी जाणार आहे. किबोर्डवरच्या डॉलरच्या चिन्हाप्रमाणे रुपयाच्या चिन्हासाठीही सोय केली जाणार आहे. हे सगळं होईल तेव्हा होईल पण काही हौशी मंडळींनी आपली सोय करुन दिलीये.


मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये आणि ( तत्सम ईतर प्रोग्राम्समधे ) आपण हे रुपयाचं चिन्ह वापरु शकतो. त्यासाठी तुम्हाला Rupee_Foradian ह्या फॉन्टची मदत घ्यावी लागेल. हा फॉन्ट डाऊनलोड करण्यासाठी Rupee_Foradian ह्या लिंकवर क्लिक करा.त्यानंतर खालील चित्रांमधे दाखविल्याप्रमाणे फॉन्ट फोल्डरमध्ये हा फॉन्ट कॉपी करा.

आता मायक्रोसॉफ्ट वर्ड चालु करा. आणि Rupee Foradian हा फॉन्ट सिलेक्ट करा.
किबोर्डवरच्या ह्या बटनाचा ऊपयोग करुन रुपयाचं नविन चिन्ह तुम्ही टाईप करु शकता.

आहे ना कुल !! चला तर वापरुन पहा आणि आपला अभिप्राय नक्की कळवा.

थँक्यु  म. टा. !!नविन लेख इमेल द्वारे मिळवण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.:

सौजन्य : फीडबर्नर