३१ मे, २०१०

१७ x ७ =? सांगा ना.... सतरा साते किती?

पाढे म्ह्टल की अजुनही माझ्या अंगावर काटा उभा रहातो. लहानपणी पाढे पाठ नसले की छडीसोबत गुरुजींच एक वाक्य नेहमी ठरलेलं असायचं " अरे आमच्यावेळी आमची दिडकी , पावकी तोंडपाठ असायची आणि तुम्हाला साधा १७ चा पाढा येत नाही. आता १७ च्या पाढ्याला साधा म्हणणार्‍या गुरुजींच्या विद्वत्तेला आणि गुरुजींच्या काळात आम्हाला जन्माला न घातल्याबद्द्ल देवाला नमन करुन आम्ही त्या छड्या खात असु. ( नाहीतर दिडकी, पावकी पाठ होत नाही म्हणुन आत्महत्या करण्याची सुरवात आमच्यापासुन झाली असती.)

Photobucket
तेव्हा सारख वाटायचं पाढ्यांशिवाय गणितं करता आली तर मजा येईल नाही? क्यॅल्क्युलेटर नावाचं यंत्र हे काम करत असं आमच्या कंपुतल्या एकाने सांगितलं होतं पण क्यॅल्क्युलेटर वापरायला परवानगी असुनही ईंजिनीअरींगला त्याची ताई गणितात नापास झाली होती म्हणुन ईंजिनीअरींगला जाईपर्यंत त्या यंत्रावर आमचा विश्वास काही बसला नव्हता.

त्यानंतर M.B.A. प्रवेश परिक्षेच्या वेळेस ' वैदिक मॅथ्स ' बद्द्ल कळाळं. सहज म्हणुन काही पुस्तकं चाळली तेव्हा कळालं हे काही तरी अजब प्रकरण आहे. मोठी मोठी गणितं आपण चुटकीसरशी सोडवु शकतो ( आणि तेही थोडेसे पाढे पाठ असले तरी...)

उदाहरण म्हणुन एक गणित सोडवुया


९४  x  ९२ = ?

आत्ता ९४ आणि ९२ ला जवळ आणि त्यापेक्षा मोठी, १० च्या पटीतली संख्या कोणती तर १०० बरोबर ?
दोन्ही संख्या आणि १०० ह्यांमधील फरक आहे अनुक्रमे ६ आणि ८.
ह्याची मांडणी आपण खालील प्रमाणे करुया.

आत्ता पुढची स्टेप
              ६ x  ८ = ४८
आणि
            ९४ - ८ किंवा ९२-६ = ८६.  बरोबर ना ? ( दोन्ही उत्तरं सारखीच असतील. )
लिहा खालीलप्रमाणे


  ९४  x  ९२ =  ८६४८

पहा उत्तर तपासुन .... हवं तर  क्यॅल्क्युलेटर वापरुन चेक करा !!




नविन लेख इमेल द्वारे मिळवण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.:

सौजन्य : फीडबर्नर