६ ऑग, २०१०

आया सावन 'झुम' के अर्थात.... हॅप्पी गटारी !!

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे !
ऑगस्ट महिना आला कि वेध लागतात श्रावणाचे . आणि श्रावण म्हटलं की " गटारी " आपसुक आलीच. तसं आठवड्यातुन तीनदा नॉनवेज खायची जरी सवय असली तरी गटारीची मजा काही औरचं. आणि तळीरामांसाठी गटारी म्हणजे " सोनियाचा दिनु " ( दिनु म्हनजे दिवस ...  दिनु नाव असणार्‍यांनी उगीच खुष होण्याची गरज नाही.)

"आता महिनाभर कडक  श्रावण " अशी कमीट्मेंट देनारे,  " उरलेलं एवढं चिकन कसं फेकुन देणार ? " म्हणुन पहिल्याच दिवशी नाईलाजास्तव (?) श्रावण सोडतात. " नेहमी तुझं ऐकतो ना मग आजचा दिवस मला बोलु नकोस " असा डायलॉग बायकोवर फेकणारे हिरो " एक महिना कसं कन्ट्रोल करणार ? म्हणत आठवड्याभरातचं 'आउट' होतात. " आया सावन 'झुम' के " हे गाणं गटारी आमवस्येपासुनच ईन्स्पाअर असल्याचं काहींच ठाम मत आहे.

गटारीचे असे एक ना अनेक किस्से ऐकायला मिळतात. ह्या तळीरामांच्या भावना कळायच्या असतील तर खालील प्लेअर्वरचं प्ले बटन दाबुन ह्या दारोळ्या ऐका.  
( चारोळ्या नाही दारोळ्याचं . आपल्या चारोळ्या ...तळीरामांच्या दारोळ्या . डोन्ट वरी मी काही " गटारी " साजरी करुन पोस्ट लिहायला बसलो नाही.)






Get this widget | Track details | eSnips Social DNA


 ह्या दारोळ्या एम. पी. ३ फॉरमॅटमध्ये डावुनलोड करायच्या असल्यास हया लिंकवरुन करु शकता.

काय म्हणता आहे ना भन्नाट !
गटारीचे काही किस्से तुमच्याकडे असल्यास शेअर करायला विसरु नका.
सो हॅप्पी गटारी !!



नविन लेख इमेल द्वारे मिळवण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.:

सौजन्य : फीडबर्नर