२२ फेब्रु, २०१०

पेन ड्राईव्हला बनवा स्मार्ट


portable-apps
पेन ड्राईव्ह .. मोबाईलनंतर कॉमन झालेलं अजुन एक डिव्हाईस. १२८ मबी पासुन सुरु झालेले पेन ड्राईव्ह आज ३२ ते ६४ जीबी कॅपॅसीटीचे सुद्धा मिळतात. शक्यतो डेटा स्टोरेजसाठी वापरल्या जाणार्‍या पेन ड्राईव्हला अजुन स्मार्टली आपण कसे वापरु शकतो आपण आज पाहुया.

तर तुमच्या पेन ड्राईव्हला स्मार्ट बनवणार्‍या जादुई प्रकाराचं नाव आहे पोरटेबल अप्लीकेशन्स. पोरटेबल अप्लीकेशन्स म्हणजे पेन ड्राईव्हवर ईन्स्टॉल करता येण्याजोगे प्रोग्राम्स जे तुम्ही कोणत्याही कम्प्युटरवर वापरु शकता पेन ड्राईव्हच्या माध्यमातुन. उदाहरणार्थ .. समजा " फायरफॉक्स" तुमचं आवडतं ब्राऊझर आहे आणि तुम्ही सायबर कॅफेत जो कम्प्युटर वापरत आहात त्या कम्प्युटरवर फायरफॉक्स ईन्स्टॉल नाही तर लागलीच तुम्ही तुमचा पेन ड्राईव्ह प्लग करायचा आणि पेन ड्राईव्ह मधे ईन्स्टॉल केलेल फायरफॉक्स पोरटेबल अप्लीकेशन्स वापरायचं. फक्त फायरफॉक्सच नाही तर अशी अनेक अप्लीकेशन्स आपण वापरु शकतो .. कूल ना !!!
त्यासाठी पोरटेबलअ‍ॅप्स.कॉम ह्या वेबसाईट वरुन पोरटेबल अप्लीकेशन प्लॅटफॉर्म आणि पोरटेबल अप्लीकेशन्स डाऊनलोड करु शकतो तेही अगदी चकटफु.
पोरटेबल अप्लीकेशन्सची यादी पाहिलीत तर माझ्यासारखे तुम्हीपण हरखुन जाल.
portableapps1
Mozilla Firefox, Portable Edition (web browser)
Mozilla Thunderbird, Portable Edition (email)
 MozillaSunbird,PortableEdition (calendar/tasks)
ClamWin Portable (antivirus)
Pidgin Portable (instant messaging)
Sumatra PDF Portable (PDF reader)
KeePass Password Safe Portable (password manager)
Sudoku Portable (game)
Mines-Perfect Portable (game)
CoolPlayer+ Portable (audio player)
OpenOffice.org Portable (office suite)
     - Writer (word processor)
     - Calc (spreadsheet)
     - Impress (presentations)
     - Base (database utility)
     - Draw (drawing)
ह्या अप्लीकेशन्ससोबत प्लॅटफॉर्म सुट डाऊनलोड करण्यासाठी येथे  क्लिक करा.
अप्लीकेशन्स वापरुन पहा आणि कमेन्ट टाकायला विसरु नका !!
हो पण हे अप्लीकेशन्स ईन्स्टॉल करताना तुमच्या पेन ड्राईव्हची साईझ नकी लक्षात घ्या. ४ जीबी किंवा त्यापेक्षा जास्त साईझचा पेन ड्राईव्ह असेल तर ... बाप्पा कामचं झालं ना !!!
नविन लेख इमेल द्वारे मिळवण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.:

सौजन्य : फीडबर्नर

1 प्रतिक्रिया:

अनामित म्हणाले...

लई भारी दोस्ता.