१६ एप्रि, २०१०

कष्ट-मर स्केयर !!


" कष्टमर के तो नाम मे ही 'मर' लिखा है साबजी ! " .. रॉकेटसिंग मुव्हीतला डायलॉग आठवतोय ? तुम्ही म्हणतं असाल मुव्ही जुना झाला राव आत्ता का विचारतायं ? नाही नाही रॉकेटसिंगचा सेकंड पार्ट पण येत नाहीये. पण कष्टमर म्हणजे कष्ट करुन मरणार्‍या तुमच्या आमच्या साठी एक वाईट बातमी आहे . मोबाईल सेवेच्या कष्टमर केयर चे कॉल फु़कट राहिले नाहित त्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागणार.






दैनिक जागरण ने दिलेल्या बातमी नुसार कष्टमर केयरला केलेल्या कॉल्ससाठी मोबाईल कंपन्यांना शुल्क आकारणीसाठी ट्राय ( TRI ) ने परवानगी दिली आहे. कष्टमर केयरकडे विनाकारण येणार्‍या कॉल्सवर कडी करण्यासाठी हे पाऊल उचलल्याच मोबाईल कंपन्यांच म्हणणं जरी असलं तरी दरवेळी मिळेल त्या मार्गाने ग्राहकांच्या खिशाला हात घालणार्‍या कंपन्या ह्याचा उपयोग कसा करतील हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. देवा ... वाचव रे बाबा !!

लिंक : दैनिक जागरण

नविन लेख इमेल द्वारे मिळवण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.:

सौजन्य : फीडबर्नर

4 प्रतिक्रिया:

THE PROPHET म्हणाले...

मग आवघडय गड्या!

Mahendra म्हणाले...

वाट लावणार हे लोकं ,फोन केला की होल्ड करा, पन्नास पर्याय,आणि मग माहिती.. काही खरं नाही..

अनामित म्हणाले...

हि अत्त्यांत खेदजनक बाब आहे. हि मोबाईल धारकांची खरोखरच गळचेपी आहे.

archie म्हणाले...

hey soham good job!!!!!