२२ सप्टें, २००९

हरिश्चंद्राची फॅक्टरी


'हरिश्चंद्राची फॅक्टरी' ह्यावर्षीची भारताची ऑस्करवारीसाठी अधीकृत ऍन्ट्री. ‘श्वास’ नंतर मराठीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. ऑस्करवारीसाठी अधीकृत ऍन्ट्री जाहीर झाल्यानंतर सगळीकडे कुजबुज सुरु झाली," अरे हा कुठला नवीन मुव्ही?"


सांगायचं तर हा मुव्ही मझ्यासारख्या बर्‍याच जणांना अपरीचीत असला तरी आजपर्यंत ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटानं अनेक देशी-विदेशी चित्रपट महोत्सवांमध्ये अनेक मानाचे पुरस्कार मिळवले आहेत. ही डॉक्युमेन्ट्री मुळीच नाही, भारतातल्या पहिल्याचलचित्राच्या निर्मीतीचा प्रवास दाखवणारा चित्रपट आहे. 'लग्नकल्लोळ' आणि 'मुक्कामपोस्ट बोंबिलवाडी' सारखी उत्कृष्ट नाटके देणार्‍या परेश मोकाशी ह्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. दादासाहेब फाळके ह्या भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक. ह्या असामान्य व्यक्तीमत्वाच्या असामान्य प्रयत्नांना मानवंदना देण्याचा परेश मोकाशी ह्यांचा हा प्रयत्न खरोखर वंदनीय आहे. नंदू माधव आणि विभावरी देशपांडे ह्यांची प्रमुख भुमिका असणार्‍या ह्या चित्रपटात आनंद मोडक ह्यांच संगीत असुन कला-दिग्दर्शन नितीन देसाई ह्यांचे आहे.

‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ ची वेबसाईटही लक्षणीय आहे . फॅक्टरीच्या ऑस्करवारीला हार्दीक शुभेच्छा !!


परेश मोकाशी सांगताहेत त्यांच्या चित्रपटाबद्दल ...नविन लेख इमेल द्वारे मिळवण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.:

सौजन्य : फीडबर्नर

0 प्रतिक्रिया: