२७ जाने, २००९

© कुणी करावं प्रेमं कुणावर, नसतं कुणाचं बंधन !!




कुणी करावं प्रेमं कुणावर, नसतं कुणाचं बंधन ;
प्रेम फक्त जाणतं हृद्या हृद्याचं स्पंदन !




कुणी भलतेच हिम्मतवान , खुशाल करतात वाच्यता;
मनात कुणाच्या खुपकाही , पण ओठांवर स्तब्धता !


प्रत्येकाची आपापली व्याख्या, प्रत्येकाची तर्‍हा निराळी;
कुणी लिहतं पानभर कविता, कुणी फक्त चारोळी !


संकल्पना निराळ्या सगळ्यांच्या , पण गर्भीत अर्थ एकच ;
मार्ग भले नसतील पण ईरादे मात्र नेकच !


कारण, प्रेम आहे हिरा आणि मन त्याचं कोंदण ;
कुणी करावं प्रेमं कुणावर, नसतं कुणाचं बंधन !!


:- © सोहम



कविता शेअर करायची असल्यास कॉपी पेस्ट करण्याऍवजी कृपया ह्या पोस्ट्ची लिंक द्या !!

नविन लेख इमेल द्वारे मिळवण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.:

सौजन्य : फीडबर्नर

1 प्रतिक्रिया:

Unknown म्हणाले...

khup khup chan ahe.................