३ डिसें, २००८

ऑर्कुट स्क्रॅपबुक ... रेडिफमेल मार्गे !!


" च्यामारी ह्या ऑफीस आयटीच्या , ऑर्कुट ब्लॉक करुन ठेवलयं. प्रॉक्सी वापराव्या तर सर्वरवर लॉग तयार होणार. निदान स्क्रॅप वाचायला मिळाले तरी पुष्कळ." माझ्यासारख्या असंख्य ऑर्कुटप्रेमींची कॉमन व्यथा. पण आता आपल्या दु:खावर फुंकर घालायला रेडिफमेल पुढे आलयं. सही है ना भिडू !!





सोशल नेटवरकिंग साईट्स आल्या आणि सगळी मंडळी त्यात बुडाली. ज्यावेगाने त्यांची लोकप्रियता वाढायला लागली त्याचप्रमाणात ऑफीसात ब्लॉक करण्याचं प्रमाणही. नेमकी हीच गोम लक्षात घेवुन रेडिफमेलने Orkut, Facebook, Hi5 आणि Linkedin अश्या लोकप्रिय सोशल नेटवरकिंग साईट्सला मर्यादीत प्रमाणात का होईना ऍक्सेस द्यायला सुरवात केलीय.वापरायला अतीशय सोपी अशी ही फीड सर्वीस आहे.

तुम्ही तुमच्या रेडिफ अकाऊंटमध्ये लॉगीन केलतं की Inbox आणि Feeds अश्या २ टॅब दिसतील. Feeds च्या टॅबवर क्लिक करायचं. Orkut, Facebook, Hi5 आणि Linkedin , हव्या त्या साईटचं अकाऊंट सिलेक्ट करायचं आणि तुमचं युसरनेम आणि पासवर्ड टाकायचा. हे फक्त एकदा केलं की आपलं काम संपलं.

ज्यावेळेला तुम्हाला स्क्रॅप वाचायचेत रेडिफ अकाऊंटमध्ये लॉगीन करायचं त्या त्या साईटच्या नावावर क्लिक करायचं आणि स्क्रॅप वाचयचे. माझं ऑर्कुट अकाऊंट मी ट्राय केलयं. Facebook, Hi5 आणि Linkedin वर माझं अकाऊंट नाहीये. तुम्ही ह्यांपैकी काही ट्राय केलंत तर कमेन्ट टाकुन मला जरुर कळवा. मग वाट कसली पाहतायं ? चला लागा कामाला.

नविन लेख इमेल द्वारे मिळवण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.:

सौजन्य : फीडबर्नर

0 प्रतिक्रिया: