१२ नोव्हें, २०१०

मुंबई प्रवास सुखाचा होवो !!* .... (* तुमच्या मोबाईलसोबत)

राहुल, मुळचा कोल्हापुरचा पण हल्लीच मुंबईत आलाय नोकरी निमीत्ताने. मुंबईत जॉब मिळाल्यावर स्वारी तशी खुष आहे पण साहेबांचा एक प्रॉब्लेम झालाय. त्याच काय आहे, राहुलचा जॉब आहे मार्केटींगचा. आता मार्केटींग म्हटलं की फिरणं आल आणि फिल्ड्वर जायच म्हटलं की त्याला धडकीच भरायची. का काय विचारता राव ? नव्या माणसाने मुंबई फिरायची म्ह्टलं की आली ना पंचाईत !
 


नेरळ आणि नेरूळ ही वेगवेगळी स्टेशन्स का ? मी आता ठाण्यात आहे पनवेल साठी पुढची ट्रेन किती वाजता ?  मिरारोडला जायचं तर बोरीवली ट्रेन जाते का ?  रिक्शाच्या मीटरमध्ये ३.७० झाले तर किती पैसे द्यायचे ?  ३४० नंबरची बस कुर्ल्याला जाते का ? असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या समोर अभे असायचे .. अर्थात कुणाला विचारलं तर कुणी मिसगाईड करेल अस नाही [ हे मुंबई आहे पुणा सॉरी पुणे नाही :) ], पण किती वेळा ? राहुल अगदी मेटाकुटीला आला होता.

राहुलच सोडा .. पण आपण मुंबईकरही जनरली आपली हद्द ओलांडुन दुसरीकडे गेलो की आपलीही अवस्था वेगळी नसते. सेंट्रलला रहाणारा वेस्टनला आणि तिकडचा ईकडे आला की खेळ खल्लास.

पण डोन्ट वरी आता अश्या आणीबाणिच्या वेळेला आपला अगदी जिवलग मित्र आपल्या कामी येणार आहे. हो सर्वात जास्त वेळ आपल्या सोबत असणारा आपला मित्र मोबाईल. फक्त एक  चकटफु अप्लीकेशन तुम्हाला मोबाईलवर ईन्स्टॉल करावे लागेल !! आणि हो एक दोन फिचर्स वगळता हे अप्लीकेशन चालतं सुद्धा जीपीआरएस शिवाय. आहे की नाही मस्त !!


तर ह्या मस्त , जबरदस्त अप्लीकेशनचं नाव आहे एम-ईंडिकेटर. वापरायला एकदम सोप्प आणि कमी जागा व्यापणारे हे अप्लीकेशनचं आहे. आणि ह्या अप्लीकेशनची अजुन एक खासियत म्हणजे तुमच्या मोबाईलवरुन हे सहज मित्राला शेअर करु शकता.

http://web.mobond.org/  ह्या बेबसाईट वरुन हे अप्लीकेशन डाऊनलोड करु शकता. ईंटरनेट कनेक्टीवीटी असलेल्या मोबाईलवरुन डायरेक्ट ईन्स्टॉल करायचे असल्यास http://mobondweb.mobond.org/install.jsp  ही लिंक वापरा.
 

 फिचर्स :

  • वेस्टन, सेंट्रल, हार्बर, ठाणे-वाशी सगळ्या ट्रेन्सचं टाईमटेबल.
  • तुम्हाला हव्या असलेल्या कोणत्याही ट्रेनचे थांबे ( स्टॉप्स ) त्यांच्या वेळेसहीत.
  • बेस्ट बसेस चे मार्ग
    •  कुठुन कुठे जायच आहे ह्या साठी उपलब्ध असलेल्या सगळ्या बस नंबर ची यादी.
    • बस नंबर ठाऊक असल्यास त्याचा पुर्ण मार्ग.
  • टॅक्सी-रिक्शाचं भाडेपत्रक.
  • पी. एन. आर.  स्टेटस ( ह्या साठी लोकल एस. एम. एस चार्गेस लागु )
  •  मेगा ब्लॉकची माहीती ( ईंटरनेट कनेक्टीवीटी आवश्यक )


जास्त काय सांगाव .. लागलीच वापरुन पहा आणि अभिप्राय कळवा !!

ईमेज क्रेडिट्स आणि वेबसाईट लिंक  : http://web.mobond.org/

नविन लेख इमेल द्वारे मिळवण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.:

सौजन्य : फीडबर्नर