१. डिग्सबाय ( digsby )

"digsby आहे ना भाऊ !! " digsby वापरुन AIM, MSN, Yahoo, ICQ, Google Talk, Jabber वर चॅट तर करता येतेचं शिवाय Facebook, Twitter, MySpace , LinkedIn ह्यांसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सचे अपडेट्स पण पहाता येतात.
डाऊनलोड लिंक : डिग्सबाय
२. व्हिस्टा स्टार्ट मेनु ( Vista Start Menu )

" व्हिस्टा स्टार्ट मेनु " नक्की वापरुन पहा. विंडोज व्हिस्टा आणि विंडोज एक्स्पी ह्या दोन्ही ऑपरेटींग सिस्टमवर कॉम्पॅटीबलं असणारा हा स्टार्ट मेनु फक्त लूक बदलत नाही तर काही जास्तीचे पावर ऑप्शनही देतो.
डाऊनलोड लिंक : व्हिस्टा स्टार्ट मेनु
व्हिस्टा स्टार्ट मेनु बद्द्ल मला shoutmeloud येथे कळाले.
३. माय फोन एक्सप्लोरर ( My Phone Explorer )

" माय फोन एक्सप्लोरर " ही एक जबरदस्त युटीलीटी आहे. ह्या सॉफ्टवेर द्वारा आपला सोनी ईरिक्सन फोन पीसीसुट पेक्षाही उत्तमप्रकारे कम्प्युटरसोबत सिंक्रोनाईज करता येतो. जसे आपले कॉन्टॅक्ट्स आऊट्लुक सोबत जीमेल कॉन्टॅक्ट्स बरोबर सुद्धा सिंक्रोनाईज करता येतात. कॅलेंडर ईव्हेण्ट गुगल कॅलेंडरसोबत सिंक्रोनाईज करता येतात.आपला फोन कम्प्युटरला जोडुन कम्प्युटरमधुन SMS वाचु शकतो, सेव्ह करु शकतो आणि टाईप करुन पाठवुही शकतो. ईतकेच नाही तर कम्प्युटरमधुन कॉलसुद्धा करु शकतो.
डाऊनलोड लिंक : माय फोन एक्सप्लोरर
४. पीडिफ ९९५ ( PDF 995 )

डाऊनलोड लिंक : पीडिफ ९९५
५. यूट्यूब हाय-डेफिनेशन डाऊनलोडर :
यूट्यूबवरील व्हिडीओ एचडी फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करायचे आहेत ? साधी-सोपी टेक्नॉलॉजी नक्की वाचा.
तुर्तास एव्हढेच .. अजुन काही अप्लीकेशनस पुढच्यावेळेस !!! तोपर्यंत ही अप्लीकेशनस वापरुन पहा आणि कमेन्ट्स टाकायला विसरु नका !!
2 प्रतिक्रिया:
aapan sosotechnology ha blog aaplya blogvar kasa jodlat aani tyachi link kashi dyavi tyasandrbhat mahiti please mala kalavavi, hi vinanti.....
majha email id kedarpadalkar101@gmail.com aahe.
हाय केदार,
साधी सोपी टेक्नॉलॉजी वर क्लिक केल्यानंतर हा ब्लॉग ओपन होतो ह्या बद्द्ल माहिती हवी आहे . बरोबर ?
हे अगदी सोप्प आहे . ब्लॉगर मधे पोस्ट कम्पोज करताना वरच्या रांगेत तुम्हाला काही फॉरमॅटींग टुल्स दिसतील. त्यामध्ये तीसरं बटन आहे Insert Link.
पोस्ट लिहिताना 'साधी सोपी टेक्नॉलॉजी' लिहल्यानंतर हे सिलेक्ट करायचं मग Insert Link हे बटन क्लिक करयचं त्यानंतर एक विन्डो ओपन होईल त्यामधे ब्लॉगच्या त्या पोस्टची Link म्हणजे http://sasotechnology.blogspot.com/2009/01/blog-post_13.html हे कॉपी पेस्ट करायचं म्हणजे दिसताना फक्त 'साधी-सोपी टेक्नॉलॉजी' असे दिसेल आणि त्यावर क्लिक केल्यावर ती पोस्ट ओपन होईल.
अजुन काही शंका असल्यास विचारु शकता . ब्लॉगला भेट देत रहा.
धन्यवाद.