१८ नोव्हें, २००८

सोहम .. एक साधारणं ब्लॉगर ...


ती : कोण ?
मी : मी सोहम
ती : सोहम ? सोहम कोण ?
मी : सोहम .. जस्ट सोहम ..

ती : नेमकं कोण ? ( शहारुख खान असल्यासारखा सांगतोय जस्ट सोहम .. म्हणे )
मी : सोहम .. एक साधारणं ब्लॉगर..
ती : अच्छा म्हणजे तु ब्लॉग लिहीणार व्वा !! ..( ब्लॉगरवर फुकट स्पेस मिळाल्यावर काय सगळेच लिहतात... स्पेस विकत घ्यायची असती तर लिहला असता काय ? )
मी : नसता लिहला..
ती : (जरा बावरुन )... म्हणजे ?
मी : स्पेस विकत घेवुन लिहलाच नसता.. जय हो गुगल महाराज..
ती : पण मी मनात बोलली ते तुला कसं कळालं ?
मी : कारण मी मनकवडा आहे . शहारुख खान असतो ना त्याच्या मुव्हीजमधे तसाच..
ती : अरे बापरे !!
(थोडं थांबुन ) पण लिहणार काय ह्या ब्लॉगवर ? थीम काय तुझी ? कारण मराठी अस्मितेपासुन कम्प्युटर आणि कवितांपासुन खाण्याच्या रेसीपी पर्यंत सगळ्याप्रकारचे तर ब्लॉग आहेत ईथे ..तु काय वेगळं लिहणार ? ( हे मात्र स्पष्ट तोंडावर .. मनात बोलुन काय फायदा !! )
मी : माहीत नाही ..
ती : म्हणजे .. ??
मी : नेमक काय माहीत नाही पण लिहणार काहीतरी.. म्हणुन तर विषयाच बंधन नाही ठेवलं. जे लिहावसं वाटेल ते सगळं लिहणार .
ती: धन्य.. 'वाटेल ते' लिही 'व्वाटेल ते' लिहु नको म्हणजे झालं . काय लिहायचयं माहीत नाही आणि म्हणे " सोहम .. द ब्लॉगर.. "
मी : अहं .."सोहम .. एक साधारणं ब्लॉगर.. "
ती : लिहशील ते वाचनीय असो म्हणजे झालं ..
मी : प्रयत्न तर तोच आहे ..
ती : व्हिजीटर रिस्पॉन्सवरुन कळेलंच ते.. बाकी नाव आवडलं तुझं. " सोहम " . कुणाची निवड .. नावाची ?
मी : थँक्स .. निवड माझीच .
ती: ह्यॅ !! कशी काय ?
मी : हो मीच ठेवलयं माझ नाव .. टोपण नाव आहे ते ..
ती : व्वा !! कुठुन मिळालं.. ??
मी : कुठल्यातरी मराठी मालिकेत होत ..
ती : धन्य .. ! मग खरं नाव काय ?
मी : काहीका असेना ... त्यान काय फरक पडतोय ?
ती : नको सांगुस जा ! गेलास ऊडतं !! खडुस !!!
मी : आहेच मुळी .
ती : देवा! वाचवं रे बाबा !!

नविन लेख इमेल द्वारे मिळवण्यासाठी खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.:

सौजन्य : फीडबर्नर

3 प्रतिक्रिया:

Vaishali म्हणाले...

Hi Mr soham

Nice Beginning........

All D Best!!!!

Vaishali

सोहम म्हणाले...

@ Vaishali

Thanks !!!

क्षितिज देसाई म्हणाले...

मस्त !