IMEI नंबरचा थोडक्यात परिचय म्हणजे प्रत्येक मोबाईलचा युनीक नंबर जो बॅटरीच्या खाली फोनवर प्रिंट असतो किंवा आपल्या मोबाईलवर *#06# टाईप करुन सुद्धा हा नंबर पाहता येतो.
International Mobile Equipment Identity ( IMEI ) ह्याचा खरा उदोउदो झाला दहशतवादी हल्ल्यांनंतर. कारण संपर्कांसाठी दहशतवाद्यांनी चीनी बनावटीचे मोबाईल फोन वापरात घेतले होते त्यांना योग्य ( Valid ) IMEI नंबरच नव्हता. त्यामुळे त्यांचा माग काढणे पोलिसांना मुश्किल झाले. ह्या सगळ्या प्रकरणाने खडबडुन जागे होत सरकारने अयोग्य IMEI नंबर असणार्या मोबाईलवर बंदी आणण्याचे ठरवले.
त्यामुळे गोची झाली चायनीज फोन वापरणार्यांची. कारण हे फोन अगदी ४/५ हजारात टचस्क्रीन , एम पी -४, ८ जीबी मेमरी , २ सीम , ३ सीम अश्या फिचर्ससहित मिळतात. लो बजेट असणार्यांसाठी किंवा दर २/३ महिन्यांनी फोन बदलणार्यांसाठी हे फोन म्हणजे पर्वणीचं. आता नवीन येणारे चायनीज फोन " वीथ युनीक IMEI नंबर " किंवा " टोटल मनी बॅक ईफ फाऊंड फेक " अशी जाहिरात करत फोन विकत असले तरी त्यांची विश्वासहर्ता तपासणार कशी ?
तर कोणत्याही मोबाईलचा IMEI नंबर तपासण्यासाठी नंबरींग प्लॅन ह्या बेवसुविधेची मदत घेता येईल. आपल्या मोबाईलवर *#06# टाईप करुन स्क्रीनवर आलेला IMEI नंबर ह्या पेजवर चेक करु शकतो . उदाहरणादाखल खालील रिझल्ट पहा.
मग वाट कसली पाहताय ? निकालो मोबाईल और हो जावो शुरु !!
अभिप्राय नक्की कळवा.
लिंक : नंबरींग प्लॅन
0 प्रतिक्रिया: